
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला तुफान प्रतिसाद मिळाला. याचेच सकारात्मक पडसाद कर्नाटकाच्या निवडणुकीत पाहायला मिळाले. आता भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सप्टेंबरमध्ये सुरु होणार आहे, अशी माहिती युथ काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांनी दिली.


























































