कार्यक्रम निर्मितीचे चक्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अशोक डुंबरे 

सुरुवातीच्या काळात लोक, वातावरण सर्वच नवीन होते. तसेच शब्द आणि चित्र यांचे मिळून हे नवीन माध्यम असल्यामुळे मिळालेल्या संधीतून कर्मचारी शिकत गेले. कार्पाम निर्माता केंद्रस्थानी होता. टेलिव्हिजन केंद्रामध्ये तीन प्रमुख विभाग होते. एक होता कार्पाम विभाग, दुसरा अभियांत्रिकी आणि तिसरा होता आस्थापना विभाग. अशा या तीन चाकांमुळे टेलिव्हिजन केंद्राचे कामकाज चालत असे. कार्पामाची निर्मिती हे टीम वर्क असल्याने कार्पाम रेकॉर्ड होण्याआधी होणाऱ्या प्लॅनिंग मीटिंगमध्ये निर्माता, डिझायनर, इंंजिनीअरिंग विभागाचा टेक्निकल डायरेक्टर हे उपस्थित असायचे.

टीव्ही सेंटरचे कामकाज

नवी दिल्लीतील आकाशवाणी भवनातल्या स्टुडिओत 15 सप्टेंबर 1959 रोजी पहिले प्रसारण सुरू झाले. नाव होते टेलिव्हिजन ऑफ इंडिया! पूर्व प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांचे महत्त्वपूर्ण योगदान यामध्ये होते. 15 ऑगस्ट 1965 पासून रोज एक तासाचा कार्यक्रम सुरू झाला. त्याच वर्षी शेतकरी बंधूंसाठी ‘कृषिदर्शन’ हा कार्पाम व त्यानंतर 2 ऑक्टोबर 1972 ला मुंबईतील वरळी येथे टेलिव्हिजन केंद्र सुरू झाले.

सुरुवातीच्या काळात लोक, वातावरण सर्वच नवीन. शब्द आणि चित्र यांचे मिळून हे नवीन माध्यम असल्यामुळे मिळालेल्या संधीतून कर्मचारी शिकत गेले. कार्यक्रम निर्मितीसाठी विविध विभागांचा सहभाग होता. कार्यक्रम निर्माता केंद्रस्थानी होता. टेलिव्हिजन केंद्रामध्ये तीन प्रमुख विभाग होते. कार्यक्रम विभाग, अभियांत्रिकी विभाग आणि आस्थापना विभाग. या तीन चाकांमुळे टेलिव्हिजन केंद्राचे कामकाज चालत असे. स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगसाठी सुविधा देणे उदाहरणार्थ प्रकाश योजना, ध्वनिमुद्रण कॅमेरा मेन्टेनन्स, स्टुडिओमधील एसी यंत्रणा ही कामे इंजिनियरिंगची लोक बघत. कॅमेरा विभागात दोन भाग आहेत. एक स्टुडिओ कॅमेरा आणि दुसरा बाह्य चित्रण. त्यासाठी मूवी कॅमेरा लागत असे. 1972ला या केंद्रात व्यंकट हे दाक्षिणात्य व सतीश भाटिया हे पंजाबी गृहस्थ ग्रेड वन कॅमेरामन म्हणून कामकाज बघत असत. बाह्यचित्रणासाठी मूवी कॅमेरा, फिल्म रोल लागत असे आणि शूटिंग झाल्यावर ती फिल्म प्रोसेस करण्यासाठी केंद्रामध्ये फिल्म प्रोसेसिंग लॅबमध्ये होत असे. कार्पामासाठी ध्वनीमुद्रणासाठी साऊंड

रेकॉर्डिस्टची गरज पडत असे. साऊंड रेकॉर्डिंग करणारे लोक फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट सारख्या संस्थेतून साऊंड इंजिनीअरिंगचा डिप्लोमा घेतलेले असत. टी. ल. कांताराव हे सीनियर साऊंड रेकॉर्डिंस्ट विभागप्रमुख होते. स्टुडिओमध्ये सेट लावण्याचे काम सिनिक विभागाचे कर्मचारी करत. सुरुवातीच्या काळात बिजान गुप्ता हे बंगाली तरुण विभागप्रमुख होते. त्यानंतर अमृतपाल हा पंजाबी तर विनायक चासकर हे मराठी तरुण या विभागाचे कामकाज बघायचे. त्यांच्या हाताखाली सेट बनवण्यासाठी सुतार, रंगारी व फ्लोअर असिस्टंट काम करत असत.

टीव्ही सेंटरमध्ये अजून एक महत्त्वाचा विभाग म्हणजे प्रॉपर्टी डिपार्टमेंट. सेट लागल्यावर तिथे मांडण्यासाठी विविध वस्तू पुरवणारा विभाग. याची उपविभाग – म्हणजे ड्रेस विभागातून शर्ट, कुडते, साडय़ा, शाल वगैरे पुरवले जात. नवीन माध्यम असल्यामुळे भाग घेणाऱया लोकांना किंवा कलाकारांना काहीच माहिती नव्हती. कपडे  कसे असावेत, रंग कोणते असावेत याची पण माहिती नव्हती. बरेच लोक पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे घालून येत. प्रकाश योजना झाल्यावर पांढरा कपडय़ामुळे सेपरेशन यायचे आणि चेहरा पीनवर काळा दिसायचा.

कुठलाही कार्पाम रेकॉर्ड होण्यासाठी एक प्लॅनिंग मीटिंग केली जायची. या मीटिंगमध्ये निर्माता, डिझायनर, इंजिनिअरिंग विभागाचा टेक्निकल डायरेक्टर हे असायचे. विषय कोणता आहे, किती पात्र, कोणत्या वस्तू सेटवर लागणार आहेत याची चर्चा होत असे. त्यानंतर सेट डिझायनर फ्लोअर प्लॅन बनवायचा. त्याप्रमाणे स्टुडिओमध्ये सेट बनवला जात असे. ही पूर्वतयारी फार अगोदर करायला लागायची. दर महिन्याला स्टुडिओचा रेकॉर्डिंग चंकचा चार्ट बनवला जायचा. प्रत्येक निर्मात्याने स्टुडिओ कधी पाहिजे, कोणत्या वेळी पाहिजे याचे रिक्विजेशन अगोदर द्यावे लागत असे. म्हणून निर्मात्याला तीन महिने अगोदर कार्पामाचे शेडय़ुल बनवायला लागायचे आणि संचालकाचे अप्रूव्हल घ्यावे लागायचे. कधी कधी एखादा रेकॉर्डिंग चंक कॅन्सल झाला तर ऐनवेळी दुसऱ्या गरजू निर्मात्याला दिला जायचा.

टेलिव्हिजन निर्मितीतला अजून एक महत्त्वाचा विभाग म्हणजे ग्राफिक्स विभाग. ज्यात  जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मधून प्रशिक्षित झालेले लोक कार्यरत होते. कार्पामाचे नाव, त्याची टायटल कॅप्शन तयार करणे, कलाकाराचे नाव सुपर करण्यासाठी सुपर कॅप्शन तयार करावी लागत असे. त्याने दर्शकांना कलाकाराच्या नावासकट ओळख होत असे. कार्पामात वापरल्या जाणारे फोटो पेपरवर चिटकवण्याचे काम इथे चालत असे. टीव्ही पीनला एक्स्प्रेस महत्त्वाचा असतो. थ्री बाय फोर असा रेशिओ असतो. याने टीव्हीवरचे चित्र किंवा व्हिज्युअल्स व्यवस्थित दिसतात. कार्पामात भाग घेणारे कलाकार, सहाय्यक, संकलक, कॅमेरामन, साऊंड रेकॉर्डिंग निर्माता, यांची एडिट कॅप्शन कार्यक्रमाच्या शेवटी निर्मात्याला द्यावी लागत असे. श्री. प्रभाकर चव्हाण या विभागाचे सुपरवायझर होते. सेंट्रल फिल्म फुल हा विभाग तितकाच महत्त्वाचा होता. हिंदी-मराठी अन्य भाषिक फिल्म बाहेरून मागवणे आणि  चित्रगीत किंवा छायागीत या कार्पामासाठी मराठी-हिंदी गाणी उपलब्ध करून देणे. तसेच महत्त्वाचे कार्पाम राष्ट्रीय प्रसारणासाठी दिल्लीला पाठवणे, बाह्य चित्रणासाठी फिल्म रोल पुरवणे इत्यादी कामे या विभागाला करावी लागत. सुरुवातीला मधुकर लेले नंतर श्रीयुत वा. रा. सराफ हे इथे अधिकारी म्हणून कार्यरत होते.

मेकअप विभागही महत्त्वाचा आहे. स्टुडिओ कार्पाम रेकॉर्ड करण्याआधी कलाकार, निवेदक, निवेदिका, वार्तापत्र वाचणारे न्यूज रीडर हे आधी मेकअप करून कार्पामात सहभागी होत असे. मंत्री, मुख्यमंत्री किंवा अति महत्त्वाच्या व्यक्ती या सर्वांना मेकअप करणे जरुरीचे होते. कारण चेहरा तेलकट असतो व तो पीनवर चमकू नये म्हणून मेकअप करणे आवश्यक असते.

टीव्ही सेंटरमध्ये सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणजे वृत्त विभाग. सुरुवातीला मराठी आणि हिंदी भाषेत बातम्या दिल्या जात होत्या. श्री. दिगंबर खाडे हे या विभागाचे संपादक होते. ते आकाशवाणी केंद्रातून प्रतिनियुक्तीवर आलेले होते. डॉ. गोविंद गुंठे हे या विभागाचे निर्माता  प्रमुख होते. भारती आचरेकर, आल्हाद धर्माधिकारी हे मदतनीस म्हणून काम पाहायचे. मुंबई केंद्रात डॉ. विश्वास मेहंदळे यांना पहिले बातमीपत्र वाचण्याचा मान मिळाला होता. या विभागात सुरुवातीला ज्योत्स्ना किरपेकर, भक्ती बर्वे, अनंत भावे, चारुशीला पटवर्धन, स्मिता तळवळकर, शोभा तुंगारे, विनायक देशपांडे, अजित देशपांडे, मोहन गोखले, नंतर प्रदीप भिडे न्यूजरीडर म्हणून सामील झाले. हिंदी भाषेत सरिता सेठी, मंजू मित्तल, हरीश भीमाणी, वीणा मिश्र, नितीश भारद्वाज, स्मिता पाटील हे वृत्तनिवेदक होते. 1974मध्ये इंग्रजी बातम्या सुरू झाल्या. श्रीयुत कन्वर सिन्हा हे निर्माते होते. जर्सन डिकुना, प्रताप शर्मा, निर्मला मंथन, लुकू सन्याल हे वृत्तनिवेदक होते. काही दिवसानंतर डॉली ठाकूर, सिद्धार्थ काक हे सामील झाले. मुंबई टीव्ही सेंटर हे पहिले केंद्र होते जिथे तिन्ही भाषांत वार्तापत्र प्रसारित होऊ लागली.

टीव्ही सेंटरच्या मराठी विभागात सुरुवातीला आबा देशपांडे ऊर्फ आकाशानंद हे ‘ज्ञानदीप’ तर मनोहर पिंगळे ‘कामगार विश्व’ सुहासिनी मुळगावकर ‘सुंदर माझे घर’ आणि म्युझिकल कार्यक्रम पाहत असत. मी ‘आमची माती आमची माणसं’ हा शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम तयार करत. केशव केळकर ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ हा कार्यक्रम तर याकूब सईद नाटक विभाग तसंच ‘हास परिहास’ हा कार्यक्रम तयार करायचे. आर. एस. सावदेकर ‘युवा दर्शन’ व आस्थापनाचा विभाग सांभाळत होते.

जे. बी. देसाई, ज्योती व्यास, नयना दासगुप्ता, कांती मड़िया, मरियम जेठापूरवाला हे लोक गुजराती कार्पामाची निर्मिती करत होते. हिंदी आणि इंग्रजी विभागात टी.पी जैन, वीरेंद्र शर्मा, कुमार वासुदेव, अनुश्री दत्त, वेदप्रकाश, निशा विचित्र, टी.एन.मोहन हे निर्माते काम करत होते. कार्पामाची निर्मिती एक टीमवर्क असते. स्टुडिओच्यावर असलेल्या प्रोडक्शन पॅनलला पीसीआर म्हणतात. तिथे निर्माता, त्याचा मदतनीस, व्हिजन मिक्सर करणारा इंजिनियर स्टुडिओमधल्या कॅमेरामन, आर्टिस्ट फ्लोअर मॅनेजर यांना हेडफोनद्वारे सूचना देत. फ्लोअर मॅनेजर निर्मात्याचा स्टुडिओ प्रतिनिधी असल्याने तो सांगेल त्याप्रमाणे सर्वांनी शिस्तीने कार्पाम पार पाडायचा असतो.

कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगपूर्वी संचालकाकडे प्रपोजल पाठवून मान्यता घेतल्यावर आस्थापना विभाग कलाकारांचे मानधनाचे धनादेश काढते. कार्यक्रमाचे प्रसारण मिनिट टू मिनिट कसे होत आहे याची नोंद डय़ुटी ऑफिसर किंवा ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह करतो. काय चुका झाल्या याची नोंद करतो. रेकॉर्डिंग झाल्यावर कार्यक्रमाचे धनादेश कलाकारांना अदा करण्याचे काम डय़ुटी ऑफिसर करतो. असे मोठे चक्र आहे.

(लेखक माजी दूरदर्शन निर्माते आहेत.)