सुंदर मी होणार : पावसाळय़ात घ्या केसांची काळजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मृणाल घनकुटे

पावसाळय़ात त्वचेप्रमाणे केसांचीसुद्धा बरीच काळजी घ्यावी लागते. पावसाळय़ाचे दिवस खूप आनंददायी वाटत असले तरी केसांवर होणाऱ्या परिणामांबद्दल बोलाल तर या मौसमात केस शुष्क, विस्कटलेले (फ्रिझी) दिसतात. पावसाळय़ात हवेतील आर्द्रता वाढते. यामुळे केस कुरळे होतात आणि त्यामुळे त्वचा आणि केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात.

पावसाळय़ातील आर्द्रतेमुळे घाम आणि चिकटपणाचा त्रास होतो, तर दुसरीकडे केस रेशमी दिसण्याऐवजी फुगलेले आणि विखुरलेले दिसतात. जर तुमचे केस आधीच कोरडे असतील तर केस फ्रिझी (विस्कटणे) होण्याची समस्या अधिक होऊ शकते.या समस्येवर अनेक उपाय केले जातात. अशा परिस्थितीत केसांची समस्या दूर करण्यासाठी काही गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. त्वचारोग तज्ञ डॉ. शरिफा चाऊस यांनी पावसाळय़ात केसांची कशी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.

केस घट्ट बांधू नका

केस खूप घट्ट केल्याने केस गळण्याची समस्या वाढू शकते. तुमचे केस नेहमी हलके बांधा आणि केस नेहमी मोकळे सोडू नका किंवा बांधून ठेवू नका. दिवसातून किमान दोनदा पंगवा करा.

उशीसाठी योग्य कव्हर निवडा

केसांचा फ्रिझीपणा कमी करण्यासाठी उशीचे कवर घेताना सिल्कच्या कपडय़ाचा वापर करा. त्यामुळे झोपताना केसांचे गुंता होत नाही आणि केसांना त्रास होणार नाही.

हिट स्टाइलिंग कमी करा

फ्लॅट आयर्न, कार्ंलग आयर्न किंवा ब्लो ड्रायर्ससारख्या अति हिट स्टाईलमुळे पावसाळय़ात तुमच्या केसांचे आणखी नुकसान होऊ शकते. शक्य तितके कमी हिट सेटिंग वापरा आणि नुकसान कमी करण्यासाठी हिट प्रोटेक्टंट स्प्रे लावा.

कमी प्रमाणात शॅम्पू

आठवडय़ातून दोन वेळा केस धुवा. त्यामुळे केसांचा पोत सुधारण्यास मदत होईल. केसांना डिप पंडिशनिंग करा. आठवडय़ात एकदा आणि तेल लावा. अशा प्रकारे पावसाळय़ात तुम्ही केसांची काळजी घेऊन केस सुरक्षित ठेवू शकता.

केसांना पावसात भिजण्यापासून वाचवा

डॉ. शरिफा चाऊस यांच्या मते, पावसाच्या पाण्यामुळे कुरळे केस आणखीनच राठ व कोरडे होतात. त्यामुळे पावसात भिजणे शक्यतो टाळा. तसेच घरातून बाहेर पडण्यापूर्वी केस भिजू नयेत म्हणून पॅप घाला किंवा छत्री घ्या. चुकून तुम्ही पावसात भिजलात तर घरी परतल्यावर टॉवेलने केस नुसते सुकवण्याऐवजी लगेच शॅम्पूनी केस धुवा. कुरळय़ा केसांना मऊ ठेवण्यासाठी हायड्रेटिंग शॅम्पू वापरावेत.