
मधुमेहाचे प्रमाण वाढण्यापाठीमागे काही कारणेही आहेत. यातील पहिले कारण म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव या असू शकतात. अशा परिस्थितीत लोक औषध खातातच असे नाही तर घरगुती उपायही करतात. असे काही महत्वाचे उपाय आम्ही या लेखात सांगणार आहोत. यातील काही उपाय तुम्ही करु शकता. याद्वारे तुम्ही शरीरातील साखरेची पातळी कमी करू शकता. चला जाणून घेऊया त्या घरगुती उपायांबद्दल….
आरोग्य तज्ज्ञांच्या मते काही पानांच्या माध्यमातून आपण रक्तातील साखर नियंत्रित करू शकतो. सकाळी ब्रश न करता खाली दिलेली पाने पाण्यात मिसळून प्या. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यात मदत होईल.
मधुमेहासाठी उपयोगी ठरणारी पाने
आंब्याची पाने
पेरूची पानं
कढीपत्ता
तुळशीची पानं
इन्सुलिन वनस्पतीची पाने
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे नैसर्गिक उपाय
अळशीच्या बीयांमध्ये फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे रक्तातील साखर कमी होण्यासोबतच फॅट्स कमी करण्याचीही क्षमता असते. सकाळी रिकाम्या पोटी चमचाभर अळशीच्या बिया चावून चावून खा. त्यावर ग्लासभर पाणी प्यावे.
कडुलिंबाची पानं आरोग्याला फायदेशीर आहेत. यामुळे शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण सुधारते.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित सकाळी ग्लासभर पाण्यात 8 कडुलिंबाची पानं उकळा. हे पाणी गाळून प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
आवळ्यातील व्हिटॅमिन सी घटक स्वादूपिंडाचे कार्य सुधारायला मदत करतात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. कपभर पाणी दोन चमचे आवळ्याचा रस मिसळा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
मधुमेहासाठी उपयोगी ठरणारी पाने
आंब्याची पाने
आंब्याच्या पानांमध्ये मॅंगीफेरिन एन्झाईम आढळते तसेच यामध्ये अल्फा ग्लुकोसिडेस रोखण्याची क्षमता असते. आंब्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. हे दोन्ही आपल्या रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल कमी करतात. सकाळी उठल्यावर आंब्याच्या पानांचे पाणी प्यायल्यास साखरेची पातळी नियंत्रित राखण्यास मदत होते.
पेरूची पानं
पेरू आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु त्याच्या पानांमध्ये औषधी गुणधर्मही अधिक आहेत. संशोधनात असे दिसून आले आहे की, पेरूच्या पानांचा रस अल्फा ग्लुकोसिडेसची क्रिया रोखतो. हे एक प्रकारचे एंझाइम आहे. जे स्टार्च आणि इतर कार्बोहायड्रेट्सचे ग्लुकोजमध्ये खंडित करते. पेरूची पाने पाण्यात उकळून प्यायल्यास रक्तातील साखरही नियंत्रणात राहते.
कढीपत्ता
कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कढीपत्ता मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. कढीपत्त्यात फायबर मुबलक प्रमाणात आढळते आणि त्यामुळे पचनक्रिया मंदावते. यामुळे खाल्लेल्या अन्नाचे चयापचय लवकर होत नाही आणि त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तुम्ही सकाळी ब्रश न करता पाण्यासोबत कढीपत्ता देखील घेऊ शकता.
तुळशीची पानं
तुळस ही एक अशी वनस्पती आहे, जिला आयुर्वेदिक महत्त्वासोबतच धार्मिक महत्त्व आहे. तुळशीमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आढळतात जे शरीराला अनेक गंभीर आजारांपासून वाचवतात. तुळशीमुळे आपल्याला संसर्ग टाळण्यासही मदत होते. जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर तुळशीची पाने उकळून त्याचे पाणी सकाळी लवकर प्या.
इन्सुलिन वनस्पतीची पाने
मधुमेहाच्या रुग्णांसाठी इन्सुलिन हे रामबाण औषधापेक्षा कमी नाही. जेव्हा मधुमेहाची केस जुनी असते तेव्हा डॉक्टर रुग्णाला इन्सुलिनचे इंजेक्शन देतात. जर तुम्हाला मधुमेहाची सौम्य लक्षणे असतील तर तुम्ही इन्सुलिन वनस्पतीच्या पानांचे सेवन करू शकता. त्याची पाने रक्तातील साखरेची पातळी कमी करतात.



























































