संतसाहित्याने नटलेला ‘बोलावा विठ्ठल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंचम निषादच्या वतीने ‘बोलावा विठ्ठल’ हा अभंगवाणीचा कार्यक्रम आषाढी एकादशीला होणार आहे. या मैफलीत पद्मजा फेणाणी-जोगळेकर, देवकी पंडित आणि जयतीर्थ मेवुंडी यांच्यासारखे दिग्गज कलाकार महाराष्ट्र आणि कर्नाटकातील संतांनी रचलेल्या बाराव्या शतकातील अभंग, भक्तिमय काव्यरचनेच्या आत्म्याला स्फुरण देणाऱया सादरीकरणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतील. ही मैफल षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृहात 29 जून 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सुरू होईल.

पंचम निषाद या संस्थेतर्फे गेली 17 वर्षे ‘बोलावा विठ्ठल’ ही अभंगवाणीची मैफल खास आषाढी एकादशीला आयोजित केली जाते. या माध्यमातून युवा पिढीला आपल्या पारंपरिक मूल्यांचे आणि तत्त्वज्ञानाचे महत्त्व थोर संतवाणीतून पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. मैफल सशुल्क आहे.