भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार; देवबंदच्या रुग्णालयात उपचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर आज उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात चंद्रशेखर आझाद जखमी झाले असून त्यांच्यावर देवबंदच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या हल्ल्यात आझादसोबत असलेला त्यांचा एक सहकारीही जखमी झाला आहे.

चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेशातल्या देवबंद या ठिकाणी कारने जात होते. तेव्हा त्यांची गाडी सहारनपूर येथे असतानाच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. एक गोळी कारच्या दरवाजातून जाऊन अझाद यांना लागल्याने ते जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले आहेत. दरम्यान, महिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी आझाद यांना देवबंद येथील रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारामुळे गाडीच्या सर्व काचा फुटल्या आहेत.

हे तर जंगल राज – अखिलेश यादव

चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर तोफ डागली. उत्तर प्रदेशात जंगल राज सुरू असल्याचे नमूद करत त्यांनी घटनेचा निषेध केला.