Ashes 2023 – तिसरी अ‍ॅशेस कसोटी आजपासून; अ‍ॅण्डरसनला डच्चू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉण्टिंगने जेम्स अॅण्डरसनला संघातून वगळावे, अशी केलेली मागणी मान्य करताना इंग्लिश संघ व्यवस्थापनाने अॅण्डरसनला तिसऱया अॅशेस कसोटीतून वगळले आहे. तसेच वेगवान गोलंदाज जोश टंगलाही डच्चू दिला असून मार्क वूड, ख्रिस व्होक्स आणि मोईन अली या तिघांची अंतिम अकरा खेळाडूंमध्ये निवड केली आहे.

पहिल्या दोन्ही कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकल्या असून हेडिंग्लेमध्येही ते विजय ठरले तर यंदाही अॅशेस त्यांच्याकडे राहणार. ऑस्ट्रेलियाकडून अॅशेस खेचून आणायचा असेल तर इंग्लंडला पुढील तिन्ही कसोटी जिंकाव्या लागणार आहेत. तिसरी कसोटी अनिर्णित राहिली तरी अॅशेस ट्रॉफी पुन्हा ऑस्ट्रेलियाच घेऊन जाईल. त्यामुळे आता इंग्लंडला विजयाशिवाय पर्याय उरलेला नाही. म्हणून त्यांनी संघात दोन बदल करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.

सलग दोन कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियन संघ सुपर फॉर्मात आहे. त्यांच्या संघात बदल होण्याची शक्यता कमीच आहेत. केवळ जखमी नॅथन लायनच्या जागी टॉड मर्फीला संधी मिळण्याची शक्यता आहे.

 इंग्लंडचा अंतिम संघ –झॅक क्राऊली, बेन डकेट, हॅरी ब्रुक, ज्यो रुट, जॉनी बेअरस्टॉ, बेन स्टोक्स (कर्णधार), मोईन अली, ख्रिस व्होक्स, मार्क वूड, ऑली रॉबिन्सन आणि स्टुअर्ट ब्रॉड

 ऑस्ट्रेलियन संभाव्य संघ – डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रव्हिस हेड, पॅमरून ग्रीन, अॅलेक्स पॅरी, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, टॉड मर्फी, स्कॉट बोलॅण्ड.