
विविध क्रीडा प्रकारांत प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंच्या सन्मानार्थ दिल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सन 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
या पुरस्कारांमध्ये उल्लेखलेल्या तिन्ही वर्षांतील पुरस्कारांमध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरवर पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) या विभागांचा समावेश आहे.
या सर्व प्रकारांमध्ये निवड झालेल्या क्रीडापटू आणि मार्गदर्शक यांची एकूण संख्या 116 आहे. या पुरस्कारांत 2019-20 वर्षांसाठी श्रीकांत वाड तर 2021-22 या वर्षासाठी आदिल सुमारीवाला यांची जीवनगौरव पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.





























































