ओबीसींसाठी ऑगस्टपासून नवी 22 वसतिगृहे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

राज्यात इतर मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी 22 नविन वसतिगृहे ऑगस्ट अखेरीपासून सुरू करण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही. त्यांना शहराप्रमाणे वार्षिक भत्ता देण्यात येणार आहे, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली.  काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून ओबीसी वसतिगृहांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी ओबीसींसाठी प्रत्येक जिह्याच्या ठिकाणी 100 विद्यार्थी क्षमतेचे मुलांसाठी एक आणि मुलींसाठी एक याप्रमाणे 36 जिह्याच्या ठिकाणी 72 सरकारी वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत. त्यापैकी 22 वसतिगृहे ही ऑगस्टच्या अखेरीपासून सुरू होणार असल्याची माहीती दिली. या चर्चेत उमा खापरे, कपिल पाटील, सुधाकर अडबाले यांनी सहभाग घेतला.