शिवडीत उद्या महाआरोग्य शिबीर 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवडी विधानसभेच्यावतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन  करण्यात आले आहे.  हे शिबिर रविवार, 23 जुलै रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळेत शिवडी टी.जे.रोड येथील बृहन्मुंबई महापालिका वाहनतळ, सेलिस्टिया येथे होणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या सहकार्याने होणाऱया या शिबिरात केईएम रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर सहभागी होणार असून रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल. युरिक ऑसिड, ईएनटी, त्वचारोग, बालरोग तपासणी, स्त्राr रोग तपासणी करण्यात येणार आहे. विभागातील अधिकाधिक नागरिकांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन शाखाप्रमुख किरण तावडे यांनी केले आहे.