सांताक्रुझमध्ये इमारतीला आग; वृद्धाचा गुदमरून मृत्यू  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांताक्रुझमध्ये आज दुपारी सहा मजली इमारतीला लागलेल्या आगीत दोन जण अडकून पडले. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत त्यांची सुटका केली. मात्र, धुरामुळे गुदमरून वृद्धाचा मृत्यू झाला तर महिलेला उपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

सांताक्रुझ पश्चिमेकडील पोदार स्कूलच्या बाजूला असलेल्या हरीप्रीत या सहा मजली रहिवासी इमारतीला आज दुपारी तीनच्या सुमाराला आग लागली. यात सहा मजल्यांवर एक महिला आणि एक पुरुष अडकून पडले. अग्निशमन दलाला याची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने आग नियंत्रणात आणली आणि अडकून पडलेल्या दोघांची सुटका केली. महिलेवर 108 रुग्णवाहिकेत डॉक्टरांकडून उपचार केल्यानंतर त्याला घरी जाऊ देण्यात आले तर वृद्धाला उपचाराकरिता कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्याआधीच डॉक्टरांनी नितेश जोशी (65) यांना मृत घोषित केले.