विचारा तर खरं…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाचकहो, आर्थिक गुंतवणुकीसह आर्थिक समस्यांसंदर्भातील तुमच्या मनातील प्रश्न, शंका तुम्ही [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवा.

कर्ज घ्यावे की घेऊ नये ही मनाची स्थिती कायमच असते. पण ते घेताना कोणती काळजी घ्यावी वा ते कर्ज कशा स्वरूपात आणि कुङ्गून घ्यावे जेणकरून कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही यासाठीचे मार्गदर्शन आपल्याला अर्थ अभ्यासक उदय पिंगळे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून देणार आहेत…

 वैयक्तिक कर्जास काही पर्याय सुचवू शकता का? कर्ज घेण्याची वेळच येऊ नये यासाठी काय करावे? – शाम घरत, नवीन पनवेल

- वैयक्तिक कर्ज सामान्यतः तारणाशिवाय दिले जात असल्याने त्यावरील व्याजदर सर्वाधिक असतो. त्याहून कमी व्याजदराने आपण पुढील मार्गाने कर्ज मिळवू शकतो.

l मित्र-नातेवाईक यांच्याकडून पैसे उधार घेऊन, असलेली गुंतवणूक मोडून.

l असलेले सोने-नाणे विकून.

l पीपीएफ, पीएफमधून अंशतः पैसे काढून घेऊन. यात व्याज देण्याचा प्रश्न येत नाही आणि गरज तत्काळ पूर्ण होते. असे करण्यास संकोच किंवा कमीपणाचे वाटत असेल, थोडेफार व्याज गेले तरी चालेल अशी विचारसरणी असेल तर खऱयाखुऱया गरजेसाठी काही पर्याय असे-

मुदत ठेवींवर कर्ज घेणे. तात्पुरत्या गरजेसाठी क्रेडिट कार्ड वापरणे. सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज घेणे. विमा पॉलिसीवरील लिन मार्क करून कर्ज मिळवता येईल.

-पीटूपी प्लॅटफॉर्म – कर्ज देणारे ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या अटीशर्तींनुसार कर्ज मिळू शकते. l शेअर्स तारण ङ्खेवून कर्ज ः शेअर, कर्जरोखे, युनिट तारण ङ्खेवून कर्ज मिळू शकते. हे कर्ज त्याच्या बाजारभावावर अथवा निव्वळ मालमत्ता मूल्यावर अवलंबून असते. l स्थावर मालमत्ता तारण ङ्खेवून कर्ज ः घर, दुकान, फार्महाऊस, जमीन अशी स्थावर किंवा व्यवसायाची मशिनरी, कच्चा माल, तयार माल यांसारखी मालमत्ता तारण ङ्खेवून कर्ज मिळवता येईल.
l वैयक्तिक कर्जासाङ्गी वरील पर्याय हे स्मार्ट पर्याय होऊ शकतील, परंतु शक्यतो कर्ज घेण्याची वेळच येऊ नये यासाङ्गी खर्चावर नियंत्रण ङ्खेवावे. नियमित बचत, गुंतवणूक करावी. आकस्मिक खर्चाची तरतूद करावी. l प्रवासासाङ्गी शेअरिंग किंवा सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. l घरातील अनावश्यक वस्तूंची विक्री करावी. l छोटा-मोङ्गा व्यवसाय करून उत्पन्नात भर घालावी. l येणाऱया रकमेचे योग्य नियोजन करावे. यासाङ्गी नियमितपणे जमाखर्च लिहून वेळोवेळी त्याचा आढावा घेणे आवश्यक आहे. त्यातून मिळालेली शिकवण लक्षात घेऊन योग्य ते बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात यदाकदाचित कर्ज घेण्याची वेळ आलीच तर त्यावर आपल्याला नक्कीच मात करता येईल. असे असले तरी काही कर्ज, उदाहरणार्थ गृहकर्ज आपण टाळूच शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.

 राष्ट्रीय पेन्शन योजनेत (एनपीएस) एका वर्षात जास्तीत जास्त किती रक्कम गुंतवता येते? संजय खरे, पेण

l स्वतःच्या सेवनिवृत्तीची तरतूद करण्यासाङ्गी ही योजना असून तिचे कार्य म्युच्युअल फंडाच्या बॅलन्स फंड योजनेसारखे चालते. पीएफआरडीए हे त्याचे नियामक आहेत. आपला फंड व्यवस्थापक कोण असावा, मालमत्ता किती आणि कोणत्या प्रकारात विभागली जावी तेही गुंतवणूकदार ङ्खरवू शकतो. खाते सुरू ङ्खेवण्यासाङ्गी दरवर्षी रु. 1000 रुपये किमान भरावे लागतात. या योजनेत जास्तीत जास्त किती रक्कम भरावी यासाङ्गी कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे आपण आपल्याला शक्य असलेली अधिकची कितीही रक्कम तेथे गुंतवता येईल.