अनैतिक संबंधातून मित्राची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लहानपणापासून दोघांची मैत्री होती. लहानाचे मोठे एकत्र झाले, पण अनैतिक संबंधामुळे दोघांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला आणि अखेर नको ते घडले. एका मित्राने रागाच्या भरात कोयत्याने वार करून दुसऱया मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना वरळी येथे घडली.

वरळीच्या बीडीडी चाळ परिसरात स्वातंत्र्यदिनाच्या सायंकाळी हत्येची घटना घडली. गिरीशने त्याच्या लहानपणापासूनचा मित्र विनोदची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. विनोदचे आपल्या पत्नीशी विवाहबाह्य संबंध असल्याचे गिरीशला समजले होते. यावरून दोघांमध्ये वाददेखील झाला होता. समोरासमोर बसून दोघांनी विषय संपविण्याबाबत बोलणीदेखील केली होती, परंतु गिरीशला राग अनावर झाला होता. अखेर त्या रागाच्या भरात त्याने विनोदवर कोयत्याने वार केले.