
नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील प्रवरा परिसर आता लव्ह जिहादच्या घटनेने चर्चेत आला आहे. अल्पवयीन मुलीला लग्नासाठी बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
हुजेब शकील शेख व साहिल सलीम शेख (रा. प्रवरानगर ता. राहाता) या आरोपींना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला सातत्याने त्रास देत लग्नासाठी आरोपी गळ घालत होता. तसेच शाळेत जाताना-येतांना रस्त्यातच आरोपींनी वारंवार विनयभंग केल्याने या त्रासाला कंटाळून मुलीच्या घरच्यांना गावही सोडावं लागलं. तरीही आरोपीकडून त्रास देणं सुरूच होते. लग्नासाठीही आरोपींकडून बळजबरी सुरूच होती. या त्रासाला कंटाळून मुलीच्या वडीलांनी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्रवरानगर येथील दोघांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहेत. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. हुजेब शकिल शेख आणि साहिल सलीम शेख यांदोघांविरोधात लोणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात लव्ह जिहाद आणी धर्मांतराच्या वाढत्या घटनांमुळे सामाजिक वातावरण बिघडले असून संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपुर, राहुरी आणी आता राहाता तालुक्यातील अनेक मुली लव्हजिहादच्या बळी ठरत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात अशाच घटनांविरोधात बेलापूर गांव बंद करून निषेध व्यक्त करीत आहे. त्यातच पुन्हा ही लव्ह जिहादची घटना घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वरील दोन्ही आरोपींविरुद्ध 354, 354 ( ड ) अॅक्ट 8 व 12 प्रमाणे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पीएसआय आशिष चौधरी करीत आहेत.


























































