देशाच्या राजकारणात जदयूची एन्ट्री, जाहीर केले अठरा राज्यांचे प्रदेशाध्यक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जनता दल युनायटेड (JDU) च्या विलीनीकरणाच्या वारंवार येत असलेल्या अफवा फेटाळून लावत जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंग उर्फ लालन सिंह यांनी 18 राज्यांसाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर केली आहे. नितीश कुमार यांनी 23 जून रोजी बिहारमध्ये देशभरातील भाजपविरोधी पक्षांना एकत्र केले होते. त्यानंतर आता जदयूने राज्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करत राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री केली आहे.

जदयूने बुधवारी जाहीर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत 18 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचे नाव आहे. अनेक राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षासह राज्य समन्वयकाचे नावही जाहीर करण्यात आले. रुही तागुंग यांना अरुणाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आहे. परेश नाथ यांना आसामचे राज्य संयोजक बनवण्यात आले आहे. उमेश सिंह कुशवाह हे बिहारचे प्रदेशाध्यक्ष राहतील. या यादीत छत्तीसगड प्रदेशाध्यक्ष माता मणि तिवारी आणि दिल्ली प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र कुमार यांची नावे आहेत.जम्मू प्रदेश अध्यक्ष म्हणून जीएम शाह (शाहीन), केरळ प्रदेशाध्यक्ष सुधीर जी कोल्लारा, कर्नाटक प्रदेशाध्यक्ष महिमा पटेल, लक्षद्वीप प्रदेशाध्यक्ष डॉ. केपी मोहम्मद साद्दिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

झारखंड प्रदेशाध्यक्ष खासदार खिरू महतो, मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्ष सूरज जयस्वाल, मणिपूर प्रदेशाध्यक्ष बिरेन सिंग, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशांक राव, नागालँड प्रदेशाध्यक्ष सेंचुमो लोथा, ओरिसा प्रदेशाध्यक्ष चित्तरंजन मोहंती, पुद्दुचेरी प्रदेशाध्यक्ष आर अरुमुगम पंजाब प्रदेशाध्यक्ष मालवेंद्र सिंह टेड्डी, आर, तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम रेड्डी, पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अमिताभ दत्ता यांचा समावेश आहे.