दहा महिन्यांनंतर बीएलओ नियुक्तीचे राज्यस्तरीय निर्देश जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखेर दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बीएलओ नियुक्तीचे राज्यस्तरीय निर्देश जारी करण्यात आले आहे. 4 ऑक्टोबर 2022 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नेमणूक, कर्तव्य व जबाबदारी तसेच प्रशिक्षणाबाबतचे निर्देश जारी केले होते. या निर्देशांची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्याचे अवर सचिव व उपमुख्य निवडणूक अधिकाऱयांनी जारी केल्या आहेत.

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे 24 मार्च रोजी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या नियुक्तीसंदर्भात कक्ष अधिकारी ललित मोहन यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी देशभरातील सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या नियुक्तीचे नवीन सर्व समावेशक सूचना 4 ऑक्टोबर 2022 रोजीच निर्गमित केल्याचे सांगितले. याप्रकरणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे व नगर जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रणदिवे यांनी राज्याच्या निवडणूक अधिकाऱयांकडे पेंद्राच्या निर्देशांची राज्यात अंमलबाजवणी करण्याची मागणी केली होती.

अखेर राज्याचे अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी सुमारे दहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बीएलओ नियुक्तीबाबतच्या सर्वसमावेशक सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱयांना दिल्या असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनांचे अनुपालन करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, जे बीएलओ कर्मचारी नियुक्त केले जातील ते संबंधित गावांमध्ये त्या भाग यादीतील मतदार असणे आवश्यक आहे. इतर 13 स्थानिक पातळीवरील कर्मचारी यांचेबरोबर शिक्षकांना कमीत कमी बीएलओ म्हणून नियुक्ती केले जावे. आवश्यकता भासल्यास शिक्षक यांच्यासाठी या कामासाठीचा दीर्घ सुट्टय़ांमध्ये व अशैक्षणिक काळात काम देणेबाबत स्वतंत्र आदेश देऊन तसा मसुदा तयार करावा, कॅन्टोन्मेंट क्षेत्रासाठी संबंधित प्राधिकरणाच्या कर्मचाऱयांचीच बीएलओ म्हणून नियुक्ती करावा, लोकसंख्येमध्ये असमतोल लिंग गुणोत्तर आढळलेल्या मतदान पेंद्रावर महिला कर्मचारी यांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात यावी, शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करू नये अशा प्रकारच्या सर्वसमावेशक सूचना जारी केलेल्या आहेत.