झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीकचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीक याचे निधन झाले आहे. हीथची पत्नी नाडिने हीने सोशल मीडियावरून त्याच्या निधनाची अधिकृत माहिती दिली. हीथ स्ट्रीक याला यकृताचा कर्करोग होता. तो गेल्या काही महिन्यांपासून तो मृत्युशी झुंज देत होता अखेर रविवारी पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला.

”3 सप्टेंबर 2023 पहाटे माझ्या आयुष्यातील माझं प्रेम व आमच्या मुलांचा बाबा त्याच्या राहत्या घरातून अनंताच्या प्रवासाला निघाला आहे. त्याला त्याच्या आयुष्यातील शेवटचे क्षण त्याच्या घरी कुटुंबासोबत घालवायचे होते”, असे हीथची पत्नी नादीने हिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

गेल्या आठवड्यात हीथच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र यावेळेस त्याच्या पत्नीने स्वत: हीथचे निधन झाल्याचे सांगितले आहे. हीथच्या मृत्यूने क्रिडाप्रेमींना धक्का बसला आहे.