विश्वचषकासाठी हिंदुस्थान संघ जाहीर, रोहित शर्माकडे कर्णधारपदाची धुरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेट विश्वचषक 2023साठी हिंदुस्थानी संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माकडे या संघाच्या कर्णधार पदाची धुरा देण्यात आली आहे. रोहितखेरीज या संघात विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांची वर्ण लागली आहे.