महागणपतीवर गुलालाची उधळण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील प्रसिद्ध आणि मानाचा बाप्पा असलेल्या “काळाचौकीचा महागणपती’’ची विसर्जन मिरवणूकही भाविकांसाठी मोठे आकर्षण असते. राजहंसावर आरूढ झालेल्या 22 फूट उंच महागणपतीला निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. काळाचौकीतील अरुंद गल्लीतून महागणपतीची मूर्ती बाहेर काढताना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बाप्पावर गुलालाची उधळण केली.