
लेखक राजन खान यांच्या मुलाने आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली. माकळ तालुक्यातील सोमाटणे फाटा – शिंदेकस्ती येथे एका गृहनिर्माण सोसायटीत सोमवारी ही घटना घडली.
डेबू राजन खान (28) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. डेबूने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामधील मजकुरानुसार आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ज्येष्ठ लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू खान हा आयटी अभियंता असून तो सोमाटणे फाटा शिंदेवस्ती या ठिकाणी राहण्यास होता. सकाळपासूनच डेबू हा घराबाहेर न आल्याने घरमालकिणीने संशय व्यक्त केला. फोनवरून तो बाहेर आला नसल्याची माहिती पुण्यात राहणाऱ्या भावाला दिली. भावाने तातडीने सोमाटणे फाटा गाठून दरवाजा ठोठावला. परंतु, आतून प्रतिसाद न आल्याने तळेगाव पोलिसांना बोलवण्यात आले.
पोलिसांनी दरवाजा तोडला त्यावेळी डेबू हा पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अकस्थेत आढळला, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी सांगितले.



























































