
ओला-उबर चालकाने भाडे नाकारल्यास किंवा 20 मिनिटांपेक्षा जास्त विलंब झाल्यास त्याला 50-75 रुपयांपर्यंत दंड लागणार असून ती रक्कम संबंधित प्रवाशाला मिळणार आहे. त्याबाबतचा धोरण मसुदा परिवहन विभागाने नेमलेल्या समितीने तयार केला आहे. धोरण मसुदा समितीची मंगळवार, 10 ऑक्टोबर रोजी बैठक होणार असून त्यामध्ये मसुद्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
ओला-उबर चालक मनमानीपणे व्यवसाय करत आहेत. प्रवाशाने कॅब बुक केल्यानंतर अनेकदा चालक उशिराने पोहोचतात, ऐनवेळी भाडे नाकारणे, कंपन्यांकडून वाट्टेल तसे लावले जाणारे भाडे याबाबत अनेक तक्रारी परिवहन विभागाकडे येतात, मात्र सध्या ओला-उबेरबाबत परिवहन विभागाचे कोणतेही धोरण नाही. त्यामुळे एखाद्या कॅब चालकाने मनमानी केल्यास त्याच्यावर कारवाई करताना मर्यादा येतात. त्याची दखल घेत परिवहन विभागाने ऍपबेस्ड कॅबच्या सेवेकरिता महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चयक नियमावली करण्यासाठी सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी प्रवासीभिमुख धोरण मसुदा तयार केला आहे.
मसुद्यातील इतर तरतुदी
z ओला-उबरसाठी कमाल भाडेदर ठरविण्यात येणार आहे. z कॅब चालवणाऱया चालकांचा विमा असणे आवश्यक आहे. z कंपनीने गाडीत बसणाऱया प्रवाशांचाही विमा काढलेला असावा. z चालकाची माहिती प्रवाशाला सहजपणे दिसावी म्हणून ओळखपत्र सक्तीचे करण्यात येणार आहे. z एखादी कॅब खराब असेल तर ती सेवेतून हटवण्याचा अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांना असणार आहे.
























































