दसऱयाला 250 कोटींच्या उलाढालीचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱयाच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ समजले जाते. मंगळवारी असलेल्या दसऱयानिमित्त सराफा बाजारात सोन्याची अक्षरशः लयलूट होणार आहे. दसऱयानिमित्त मंगळवारी दिवसभरात 120 टन सोन्याच्या विक्रीतून तब्बल 250 कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने वर्तवला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक यासह जगभरातील पेंद्रीय बँका सतत सोन्याची खरेदी करत आहेत. इस्रायल आणि हमास युद्धामुळे गेल्या  महिन्याभरात सोन्याचे दर 9 टक्क्यांनी वाढले आहेत. दसऱयाच्या पूर्वसंध्येला मुंबईत सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 62 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत. दसऱयाला सोन्याचे दर 63 हजारांवर पोहोचतील, असा अंदाज इंडियन बुलियन ज्वेलर्स असोशिएशनचे प्रवत्ते कुमार जैन यांनी वर्तवला आहे.