
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील येनोरा येथील लक्ष्मण निवृत्ती बोराडे या शेतकर्याच्या शेतातील कापूस व तुरीच्या पिकांमध्ये गांजा पिकविण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीवायएसपी बुधवंत यांनी आपले पथक आणि आष्टी पोलिसांसह परतूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी यांना सोबत घेऊन येनोरा येथील शेतात धाड टाकली. यावेळी कापूस आणि तुरीच्या पिकांमध्ये लावण्यात आलेली गांजाची जवळपास 150 ते 175 लहानमोठी झाडे आढळून आले आहेत. ही झाडे पंचनामा करून उपटून घेण्यात आली असून, ती जप्त करण्यात आली आहेत.पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत, आष्टी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके, सहायक फौजदार मुंडे, पोहवा. राठोड, राजु काळे, पोकाँ. शुभम ढोबळे, पांढरे, सज्जन काकडे, लोखंडे, इम्रान तडवी आदींनी ही कामगिरी केली आहे.


























































