
लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शनिवारी सायंकाळी हरौनी पोलीस चौकीवर छापा टाकून एका पोलिसाला 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले या घटनेनंतर पोलिसाचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे. यावेळी या लाचखोर पोलीसाला लाचलुचपत पथक अक्षरश: ओढत नेत असल्याचा व्हिडीओ समोर आला असून व्हायरल होत आहे.जिथे चौकशीनंतर आरोपी पोलिसाविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
बंथरा चौकीत 28 ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी आरोपी विशाल रावत याच्या विरोधात बंथरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. तपास केल्यानंतर दोन आरोपींना बलात्काराच्या कलमांतर्गत तुरुंगात पाठवण्यात आले. ही घटना दुबग्गा येथील एमएफ टॉवर येथे असलेल्या एका हॉटेलमध्ये घडली होती. या प्रकरणाचा तपास हरौनी चौकीचे पोलीस निरीक्षक राहुल त्रिपाठी करत होते. त्यांनी याप्रकरणी हॉटेल मालक विनोद कुमार यांची अनेकदा चौकशी केली.
घटना विनोद यांच्या हॉटेलमध्ये झाल्याने निरीक्षक राहुल त्रिपाठीने त्याला धमकावत होते, शिवाय कलम 368 (जाणूनबुजून अपहरण झालेल्या व्यक्तीला आश्रय देणे) अंतर्गत आरोपी बनवले जाईल असे सांगितले. मात्र या प्रकरणात वाचायचे असल्यास मी मदत करु शकतो असे सांगत विनोदकडे 20 हजार रुपयांची मागणी केली. विनोद यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत माहिती दिली. पथकाने राहुल त्रिपाठीला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. विनोद शनिवारी सायंकाळी चार वाजता पैसे घेऊन हरौनी चौकीत गेला. इन्स्पेक्टर राहुल त्रिपाठी याने लाचेची रक्कम हातात घेताच पथकाने अचानक छापा टाकून निरीक्षकाला रंगेहात पकडले. काही वेळ इन्स्पेक्टर राहुलला काय झाले ते समजलेच नाही. तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पकडल्यावर तो गाडीत बसायला तयार नव्हता. त्यानंतर पथकातील पोलिसांनी त्याला जबरदस्तीने ओढत गाडीत बसवले. यावेळी तो आपले अपहरण होत असल्याचे ओरडत राहिला. पण, काही वेळातच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्याला लाच घेताना रंगेहाथ पकडल्याचे स्पष्ट केले.या प्रकरणी पीजीआय पोलीस ठाण्यात रात्री उशिरा आरोपी निरीक्षकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.
ॉ
























































