
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांना आज जळगाव निवासस्थानी हृदयविकाराचा झटका आला. स्थानिक रुग्णालयात प्रथमोपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एकनाथ खडसे यांना आज दुपारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने जळगावच्या गजानन रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई रुग्णालयात हलवणार असल्याची माहिती हृदयरोगतज्ञ विवेक चौधरी यांनी दिली.
View this post on Instagram



























































