
दक्षिण कोरियामधील क्योंगसांग भागात एका रोबोटिक्स कारखान्यातील 40 वर्षीय कामगाराचा मशीनमध्ये चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा कामगार कारखान्यातील मशीन सेन्सरची तपासणी करत असतानाचं हा भयंकर प्रकार घडला.
बुधवारी पहाटे मशीन सेन्सरची तपासणी करण्यासाठी योंग (yeong – बदललेले नाव) एका मशीनजवळ उभा होता. मशीन मिरचीचे खोके उचलून कन्व्हेयर बेल्टवर ढकलत होती. अचानक मशीनने खोक्यांजवळ उभ्या असलेल्या योंगला उचलले आणि कन्व्हेयर बेल्टवर टाकले. पुढच्या काही क्षणातचं योंग मशीनखाली चिरडला गेला.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यातील इतर कामगारांनी योंगला तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र मशीनमध्ये तोंड आणि छाती चिरडली गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केले.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, कारखान्यातील मशीनमध्ये बिघाड झाल्याने भाजीच्या खोक्याऐवजी कामगाराला मशीनमध्ये ढकलले गेल्याचे समजले. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने निष्काळजीपणा झाल्याने कारखान्यातील व्यवस्थापकांची चौकशी करत आहेत.
कारखान्यातील वरिष्ठांनी अधिकाऱ्यांनी कामगाराच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आपल्या निवेदनात अचूक आणि सुरक्षित यंत्रणा बसविण्याची मागणी केली आहे.



























































