परळी नगर परिषदेला पडला दिवाळीचा विसर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळी उत्सवात आपण दिव्यांची आरास मांडून अवघा परिसर प्रकाशमय करून टाकतो.दिवाळीनिमित्त शहरातील अनेक ठिकाणी विशेषतः प्राचीन परंपरा असलेल्या ठिकाणांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. असे असताना शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवरला विद्युत रोषणाई करण्याचा विसर न.प. प्रशासनाला पडलेला दिसून आला.

अनेक घटनांचे साक्षीदार असलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर रोषणाई विनाच ठेवले असल्याचे दिसून आले. यदा कदाचित दिवाळीचा कोणताही अंदाज न.प. प्रशासनला आलेला नसावा म्हणूनच न.प. प्रशासनाने कोणत्याही प्रकारची रोषणाई केलेली दिसली नाही.यंदा टॉवरला दिवाळीनिमित्त विद्युतरोषणाई न केल्याने हिंदू सणांचे नगर परिषद प्रशासनाला काही वावडे आहे का? अशी चर्चा नागरिकात चांगलीच रंगली होती.