
तब्बल पाच वर्षांनंतर नव्याने बांधण्यात आलेल्या लोअर परळ पुलाच्या केवळ उद्घाटनाचे श्रेय लाटण्यासाठी मिंधे सरकारने पुलावरील वाहतुकीची रखडपट्टी करून ठेवली होती. मात्र स्थानिकांचा वाढता रोष आणि रोज होणारी वाहतूककाsंडी या मनःस्तापातून स्थानिकांची आणि वाहनचालकांची सुटका करण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी रेल्वे वर्कशॉप ते डिलाईल रोडच्या दिशेने जाणारी दुसरी मार्गिका आज सर्वांसाठी खुली केली. त्यामुळे स्थानिकांसह वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोअर परळ पुलाचे रखडलेले काम वेगाने करावे यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री आणि मुंबई महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला होता. शिवाय गणेशोत्सवाआधी हा पूल सुरू करावा, अन्यथा स्थानिकांसह आपण हा पूल सुरू करू, असा इशाराही त्यांनी पालिकेला दिला होता. या इशाऱयानंतर 17 सप्टेंबरला मुंबई महापालिकेने डिलाईल रोड ते वरळीच्या दिशेने येणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली होती. मात्र, वर्कशॉप ते डिलाईल रोडच्या दिशेने जाणारी मार्गिका काम पूर्ण झाल्यानंतरही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. यामुळे स्थानिकांसह वाहनचालकांची प्रचंड गैरसोय होती होती. याची गंभीर दखल घेत आदित्य ठाकरे यांनी आज रात्री ही मार्गिका बॅरिकेड्स हटवून वाहतुकीसाठी खुली केली. यावेळी उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेकर, युवासेनेचे अभिजीत पाटील उपस्थित होते.
काम पूर्ण होऊनही गेले 10 दिवस पुलाचे उद्घाटन झालेले नाही. पण केवळ बिल्डर पालकमंत्र्यांना वेळ नाही म्हणून या पुलाचे उद्घाटन रखडवून ठेवले आहे. वाहतूककाsंडी मोठय़ा प्रमाणात होत आहे. पुलाच्या उद्घाटनासाठी खोके सरकारचे व्हीआयपी नकोत. जनता त्रस्त आहे.
आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख






















































