IND VS AUS T20 – टीम इंडियाचा दणदणीत विजय, ऑस्ट्रेलियाला नमवत मालिकेत घेतली आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्णधार सूर्यकुमारच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाीला पाणी पाजत पहिला टी-20 सामना जिंकला. सूर्यकुमारने त्याच्या कर्णधारपदाला साजेसा खेळ करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला व ऑस्ट्रेलियाने दिलेले 208 धावांचे मोठे लक्ष्य दोन गडी व एक चेंडू राखून पार केले. अशा प्रकारे पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतली.

टीम इंडियाकडून या मालिकेसाठी तरुण खेळाडूंची फौज उतरविण्यात आली आहे. सूर्यकुमार या तरुण संघाचे नेतृत्व करत आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज विशाखापट्टनम येथे खेळवण्यात आला. या सामन्यात नाणेफेक जिंकत टीम इंडियाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी ध़डाकेबाज फलंदाजी करत 20 षटकात 208 धावांचा डोंगर रचला.

एवढे मोठे लक्ष्य गाठताना सुरुवातीला टीम इंडियाचा धांदल उडाली. यशस्वी जैस्वाल (21) व ऋतुराज गायकवाज 0 बाद झाले. त्यानंतर आलेल्या इशान किशन (58) व सूर्युमारने (80) धावा करत टीम इंडियाचा खेळ सावरला. त्यानंतर रिंकू सिंगने नाबाद राहत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. शेवटच्या दोन चेंडूत टीम इंडियाला एक धाव हवी असताना रिंकू सिंगने षटकार मारत विजयावर नाव कोरले.