Breking News – उत्तरकाशीतील बचावकार्य यशस्वी; बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात अखेर 17 दिवसांनी यश आले आहे. मजुरांना बाहेर काढण्यासाठी 17 दिवस अथक प्रयत्न सुरू होते. अखेर रॅट मायनिंग पथकाने केलेल्या कामाला यश आले आणि बचाव पथक अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहचले. त्यानंतर बचाव पथकाने 17 दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात येत आहे.

तब्बल 17 दिवसांपासून बोगद्यात अडकलेले मजूर सुखरुप बाहेर यावे, यासाठी त्यांच्या कुटुंबियांसह देशभरातून प्रार्थना करण्यात येत होती. अखेर बचाव पथकाच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि मजूरांपर्यंत हे पथक पोहचले. मजुरांना बाहेर काढण्याचे काम सुरु झाल्यानंतर काही वेळातच सर्वच्या सर्व 41 मजुरांना बाहेर काढण्यात येणार आले. या बचाव कार्यात रॅट मायनर्सचे योगदान महत्त्वाचे आहे.