
नोएडामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नोएडातील एका कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव आणल्याची घटना समोर आली आहे.तसेच आरोपीने पीडितेचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली.याप्रकरणी तरुणीने सेक्टर-63 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, गाझियाबादची येथील ही तरुणी सेक्टर-63 मध्ये असलेल्या कंपनीत काम करते. काही दिवसांपूर्वी तिची चिजरसी येथील रहिवासी जुबेर याच्याशी ओळख झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर तरुणीने आरोप केला आहे की, 11 जानेवारीला जुबेरने तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.दरम्यान, त्याने मोबाईलवर तिचा व्हिडिओही बनवला. यानंतर जुबेर तिच्यावर धर्मांतरासाठी सातत्याने दबाव टाकत होता. तसे न केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता.अखेर त्या तरुणीने पोलिसात धाव घेतली.
पोलीस स्टेशन प्रभारींनी सांगितले की, तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी जुबेर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने ज्या व्हिडीओचा दावा केला तो मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.




























































