वयाने फरक पडत नसतो,पात्रता महत्त्वाची असते, जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार यांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिग्गज टेनिस खेळाडू रोहन बोपण्णाने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावलं. 43 व्या वर्षी ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणारा बोपण्णा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून रोहन बोपण्णा यांचे अभिनंदन केले आहे. त्याच पोस्टमधून त्यांनी अजित पवार यांना टोलाही लगावला आहे.


”हिंदुस्थानचा टेनिसपटू रोहन बोपण्णा याने मॅथ्यू एब्डेनच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद पटकावल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन! रोहन बोपण्णा हे विजेतेपद पटकावणारा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला आहे. प्रतिभा आणि अनुभवाला वयाची मर्यादा नसते, हे त्याने आपल्या खेळातून दाखवून दिलंय. लक्षात असू द्या… खेळ असो वा राजकारण, वयाने फरक पडत नसतो.पात्रता महत्त्वाची असते”, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला आहे.