
गुजरात पोलिसांनी रविवारी मुंबईत येऊन मौलाना मुफ्ती सलमान अझहरी यांना घाटकोपरमधून ताब्यात घेतले. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर घाटकोपर पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा जमाव जमला. घोषणाबाजी झाली. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. मुफ्ती सलमान अझहरी यांनी 31 जानेवारीच्या रात्री गुजरातच्या जुनागडमधील बी विभाग पोलीस ठाण्याजवळ हे कथित प्रक्षोभक भाषण केले होते.




























































