चिपळूणातील राडा – चारशे जणांवर गुन्हे दाखल, तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शुक्रवारी चिपळूणात शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर नारायण राणेंच्या गुंडांनी धुडगूस घातला. आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर कोकणातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. दगडफेक करणाऱ्या राणेंच्या गुंडांऐवजी पोलीसांनी शिवसैनिकांची धरपकड सुरु केली आहे. चारशेजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनजणांना अटक करण्यात आली आहे.

काल सायंकाळी नीलेश राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला. गुहागरच्या सभेपूर्वीच चिथावणीखोर वक्तव्य करुन माजी खासदार नीलेश राणे यांनी राडा करण्याचा पावित्रा घेतला होता. काल सायंकाळी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर धुमश्चक्री झाली. आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर दगडफेक झाली. यावेळी दोन्हीकडचे कार्यकर्ते भिडले. पोलीसांनी लाठीमार करत अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. चिपळूण पोलीस ठाण्यात आज चारशेजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीसांचा उर्वरित तपास सुरु आहे. कालच्या दगडफेकीत चार पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.