कणकवली, देवगड, वैभववाडीतील मुंबईवासीयांचा बुधवारी शिवसेना भवनमध्ये मेळावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, पदाधिकारी करणार मार्गदर्शन 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिह्यातील कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील मुंबईवासीयांचा मेळावा बुधवार, 13 मार्चला संध्याकाळी 5 वाजता शिवसेना भवनमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

मेळाव्याला शिवसेना नेते-खासदार विनायक राऊत हे प्रमुख मार्गदर्शक असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिह्याचे समन्वयक प्रदीप बोरकर, शिवसेना उपनेते सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे आदी उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि पदाधिकारी मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्याला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना उपनेते, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले आहे.