लोकसभा लढवणारच! बारामती मतदारसंघावरून महायुतीत द्वंद्व, मिंधे गटाच्या आमदाराने थोपटले दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना राज्यातील राजकीय नेत्यांचे आणि मतदारांचे बारामती मतदारसंघाकडे लागले आहे. येथे पहिल्यांदाच ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर त्यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उतरवले जाण्याची शक्यता आहे. आता यात मिंधे गटानेही उडी घेतली असून माजी मंत्र्याने दंड थोपटत ‘बारामतीतून लोकसभा लढणारच’, असे म्हणत दंड थोपटले आहेत.

मिंधे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. वेळ आली तर अपक्षा निवडणूक लढवेल, पण बारामतीतून लोकसभा निवडणूक लढणारच असा निर्धार शिवतारे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

महायुतीची बैठक अचानक रद्द? जागावाटप लटकल्यानं गद्दार हैराण-परेशान

माध्यमांशी बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघ देशातील 543 मतदारसंघातील एक आहे. हा कोणाचा सातबारा नाही. तिथे पवारांच्या विरोधात 5 लाख 80 हजार मतदान आहे. आता तिथे ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना दाखवला जात आहे. पण तिथे विरोधातही लोकं आहेत. त्यांनी मतदान कुठे करायचे?

अजित पवारांनी आपला अपमान केलेला. सहा-सहा पक्ष एकत्र करून कटकारस्थान केली होती. आम्ही त्यांना मतदान कसे करणार? महायुती असो किंवा काहीही असो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अजित पवारांना मतदान करण्याच्या मासिकतेत बरेच लोकं आहेत. त्यामुळे ही पोकळी भरून काढण्याचे काम मी करणार आहे, असे शिवतारे म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)