कर्नाटकातही कोबी मंच्युरियनवर बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्यानंतर कर्नाटक राज्यातही कोबी मंच्युरियनवर बंदी घालण्यात आली आहे. या मंचूरियनच्या रंगासाठी हानीकारक रोडामाइन-बीचा वापर केला जात आहे. हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. कोबी मंच्युरियनचा वापर करणाऱयांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. यासाठी कठोर नियम बनवण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱयाला सात वर्षांचा कारावास आणि 10 लाख रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी दिली. दरम्यान, मागील महिन्यात गोव्यातही यावर बंदी घालण्यात आली आहे.