डोंगराला लागलेल्या वणव्यात घर भस्मसात, जावळीतील विवर येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जावळी तालुक्यातील विवर गावातील डोंगराला अज्ञाताने लावलेल्या वणव्यात विवर गावातील सखुबाई भाऊ पार्टे यांचे घर जळून खाक झाले. घराला लागलेली आग विझविताना सखुबाई पार्टे ही वृद्धा जखमी झाली आहे. आज सायंकाळी ही घटना घडली.

जावळी तालुक्यातील विवर, हातगेघर डोंगराला अज्ञात इसमाने वणवा लावला. या वणव्याची आग संपूर्ण डोंगरात पसरली. डोंगर पायथ्याला सखुबाई पार्टे यांचे घर होते. आगीच्या झळा या घरापर्यंत पोहोचल्या. बघता बघता संपूर्ण घराला आगीने घेरले. या वणव्यात संपूर्ण घर जळून भस्मसात झाले. स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तसेच आग विझविताना सखुबाई जखमी झाल्या.

सातारा जिह्यात डोंगरपट्टय़ात वणवा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. या वणव्यात जंगल वनराई नष्ट होत आहे. त्यामुळे वणवा लावणाऱयांना शोधून वन विभागाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.