
टाटा ग्रुपच्या एअर इंडिया कंपनीमध्ये मोठय़ा प्रमाणात कर्मचारी कपात सुरू आहे. एअर इंडियाने 180 हून अधिक कर्मचाऱयांना नोकरीवरून तडकाफडकी काढले आहे. या कर्मचाऱयांमध्ये नॉन फ्लाइंग कर्मचाऱयांचा जास्त समावेश आहे. ज्या कर्मचाऱयांना नोकरीवरून काढले आहे ते सर्वजण वॉलंटरी रिटायरमेंट स्कीम (व्हीआरएस) आणि नवीन कौशल्याचा वापर करत नव्हते, असे स्पष्टीकरण एअर इंडिया कंपनीकडून देण्यात आले आहे. एअर इंडियात एकूण 18 हजार 500 हून जास्त कर्मचारी आहेत.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, फिटमेंट प्रक्रियेच्या रूपात उड्डाणविना कार्यात कर्मचाऱयांना संघटनात्मक आवश्यकता आणि वैयक्तिक योग्यतेच्या आधारावर कामे सोपवली आहेत. गेल्या 18 महिन्यांत सर्व कर्मचाऱयांच्या कामांची पडताळणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या कर्मचाऱयांना कामावरून काढले, त्या कर्मचाऱयांना अनेक स्वेच्छिक सेवानिवृत्तीच्या योजना आणि कौशल्याच्या संधी देण्यात आल्या आहेत.
आमच्या एकूण कर्मचाऱयांच्या एक टक्क्याहून कमी लोक हे व्हीआरएस किंवा रिस्किलिंग संधीचा उपयोग करण्यात सक्षम नाहीत. त्यामुळे त्यांना आमच्यापासून वेगळे व्हावे लागले.
एअर इंडिया किती कर्मचाऱयांना कामावरून काढणार आहे, याचा खुलासा पंपनीने केला नाही. एअर इंडियाने कँटिन सर्व्हिस, हायजीन आणि एसी सर्व्हिस स्टॉकमधील कर्मचाऱयांना नोकरीवरून काढले आहे.

























































