
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पोलीस पथकाने सोमवारी विमान प्रवासात दागिने चोरी करणाऱया चोरटय़ाला अटक केली. राजेश कपूर असे त्याचे नाव असून विमान प्रवासात हँडबॅग घेऊन जाणाऱया वृद्ध महिला प्रवाशांना लक्ष्य करत असे. राजेशने वर्षभरात 200 वेळा विमानांतून प्रवास केला. मृत भाऊ ऋषी कपूर याची ओळख घेऊन तो प्रवास करायचा. सावज हेरण्यासाठी तो सतत जागाही बदलत राहायचा.
























































