
नमिता दहिबावकर (65) यांचे गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांच्या त्या पत्नी होत. नमिता दहिबावकर या सुमारे 35 वर्षे सरकारी कार्यालय हायकोर्ट येथे सुपरिटेंडंट म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान, शुक्रवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.




























































