
उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या कंपनीवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांदरम्यान श्रीलंकेने अदानी समूहाकडून वीज खरेदी करण्याचा करार रद्द केला आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, अमेरिकेने केलेल्या भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपांनंतर श्रीलंका सरकारने अदानी समूहाच्या प्रकल्पांची चौकशी सुरू केली होती. यानंतर आता येथील सरकारने हा करार रद्द केला आहे.
श्रीलंकेने मे 2024 मध्ये अदानी अदानी ग्रीन एनर्जीसोबत 20 वर्षांचा वीज खरेदी करार केला होता. अदानी विंड पॉवर कॉम्प्लेक्समधून वीज खरेदी करण्यासाठी श्रीलंका सरकारने हा करार केला होता. दरम्यान, ही बातमी समोर आल्यानंतर अदानी समूहाच्या बहुतेक लिस्टेस्ट कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे.

























































