अखेर नांगी टाकली; हिंदुस्थान आयात शुल्क कमी करण्यास तयार

हिंदुस्थानने अखेर नांगी टाकली असून आयात शुल्क कमी करण्याची तयारी दर्शवली आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. कुणीतरी त्यांना आरसा दाखवला, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. हिंदुस्थान प्रचंड आयात शुल्क लादते. तुम्ही कुठलीही वस्तु तिथे विकू शकत नाही. परंतु, आता त्यांनी आयातशुल्क कमी करण्याची तयारी दाखवली आहे, असे ट्रम्प म्हणाले. दरम्यान, 2 एप्रिलपासून हिंदुस्थानवर जसाश तसे आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवरील आयात शुल्क पुन्हा महिनाभरासाठी पुढे ढकलले आहे. ट्रम्प यांनी 4 मार्चपासून  दोन्ही देशांवर आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय  घेतला होता. दरम्यान, कॅनडातील लोकांनी अमेरिकन टोमॅटो आणि सफरचंद खाणे सोडून दिल्याचे चित्र आहे.