IPL 2025 – वानखेडेवर सामना पहायला जाताय? मग मोफत उबर शटल बस प्रवासाचा आनंद घ्या, कसा ते वाचा…

मुंबई इंडियन्सचा संघा फॉर्मात आला असून गेल्या लढतीत मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. यानंतर आता मुंबईला सलग दोन सामने वानखेडेवर खेळायचे आहेत. 17 तारखेला सनरायझर्स हैदराबाद आणि 20 तारखेला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सामना होईल. या लढतीसाठी हजारो चाहते वानखेडेकडे कूच करतील.

एकाचवेळी हजारो प्रेक्षक सामना पाहण्यासाठी वानखेडेवर येत असल्याने मेट्रो, लोकलमध्ये गर्दी होऊ शकते. जास्त मागणीमुळे कॅबचे दरही वाढू शकतात. याला पर्याय म्हणून उबरने मुंबई इंडियन्सशी भागिदारी करत मोफत शटल सेवा दिली आहे. सामन्यापूर्वी बोरिवली, नवी मुंबई, ठाणे, पवई, बीकेसी ते वानखेडे स्टेडियन दरम्यान 10 उबर शटल बस धावणार आहेत. सामना संपल्यानंतर याच बस प्रवाशांना वांद्रे, वळी, बीकेसी येथे परत घेऊन जातील.

उबर शटल कसे बुक करावे

– उबर अ‍ॅप उघडा आणि वानखेडे स्टेडियम हे पिकअप किंवा ड्रॉप-ऑफ लोकेशन म्हणून सेट करा.
– शटल आयकॉन निवडा आणि पसंतीचा टाइम स्लॉट निवडा.
– सीट आरक्षित करण्यासाठी बुकिंग कन्फर्म करा.
– बसेस एमएमआरडीए ग्राउंड पार्किंग, बीकेसी येथून सुटतील.
– परतीच्या बसेस कूपरेज बँडस्टँड (वानखेडे स्टेडियमजवळ) येथून सुटतील आणि हाजी अली, फिनिक्स पॅलेडियम आणि बीकेसी येथे प्रवाशांना सोडतील.
– शिवाय, खाजगी कॅब पसंत करणाऱ्यांसाठी, मुंबई इंडियन्सचा मोबिलिटी पार्टनर, उबर, वानखेडे स्टेडियममध्ये ये-जा करण्यासाठी सवलतीच्या दरात राइड्ससाठी विशेष प्रोमो कोड देत आहे.