मसुरीत कश्मिरी शॉल विकणाऱ्या दोन तरुणांना मारहाण, 16 तरुणांचे कश्मीरमध्ये पलायन

उत्तराखंडच्या मसुरीत शॉल विकणाऱ्या दोन कश्मिरी तरुणांना काही गुंडांनी मारहाण केली आहे. त्यामुळे घाबरून जम्मू कश्मीरच्या 16 जणांनी उत्तराखंड सोडून जम्मू कश्मीरमध्ये परतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मसुरी शहरात जम्मू कश्मीरचे दोन तरुण शॉल विकत होते. तेव्हा काही तरुण आले आणि त्यांनी थेट मारहाण करायला सुरूवात केली. तसेच इथे व्यवसाय करायचा नाही अशी धमकी दिली.

या गुंडांनी या कश्मिरी तरुणांकडे ओळखपत्र मागिलते आणि निघून जायला सांगितले. शब्बीर अहमद दार हा कुपवाडमध्ये राहणारा तरुण. त्याने सांगितले की गेल्या 18 वर्षांपासून आम्ही इथे येतोय आणि व्यवसाय करतोय. इथे आल्यावर आणि मशिदीजवळ राहतो आणि बरीच वर्ष इथल्या लोकांना आम्ही ओळखतोय. पण आमच्या मदतीसाठी कुणीही धावून आले नाही. इथे कश्मीरमधून अनेक लोक व्यवसायासाठी येतात पण कधीही स्थानिक नागरिकांशी चुकीचे वागले नाही असे शब्बीर म्हणाला. या घटनेनंतर शॉल विकणारे 16 लोक कश्मीरला निघून गेले. या प्रकरणी तीन जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.