Intel कंपनी 20 टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ, सीईओ लिप बू टॅन यांनी लिहिले पत्र

कॉम्प्युटर चीप बनवणारी कंपनी इंटेल आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. कंपनीचे सीईओ लिप बू टॅन यांनी पत्र लिहून ही माहिती दिली आहे. कंपनीला अनेक कर्मचाऱ्यांची गरज नाही आणि कमी संख्येत आपण जास्त काम करू शकतो असा विश्वास टॅन यांनी व्यक्त केला आहे.

टॅन यांनी पत्र लिहून म्हटले आहे की आपण एक नवीन सुरुवात करत आहोत. मला पाहून आश्चर्य वाटलं की गेली अनेक वर्ष इंटेलमध्ये मोठ्या प्रमाणात मॅनेजर्स आहेत. मला असं वाटतं की कमी कर्मचारी असल्यावर आपण अधिक उत्तम काम करू शकतो. प्रत्येक टीममधून 8 ते 10 जणांना काढले जाईल. कंपनीला एवढ्या कर्मचाऱ्यांची गरज नाही. असे टॅन यांनी म्हटले आहे.

कंपनीतून एकूण किती जणांना काढले जाईल याबाबत अद्याप कुठली माहिती कळालेली नाही. पण एक लाख ८ हजार 900 कर्मचाऱ्यांपैकी 20 टक्के कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असे सांगण्यात येत आहे.