
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान- पाकिस्तानात तणाव वाढला आहे. तसेच पाकिस्तानकडूनही युद्धाबाबत आणि अण्वस्त्र वापराबाबत दर्पोक्ती करत फुत्कार सोडण्यात येत आहे. पाकिस्तान युद्धाची खुमखमी दाखवत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्याकडे ते फक्त चार दिवसच युद्ध लढू शकतील एवढाच शस्त्रसाठी त्यांच्याकडे असल्याची माहिती अका अहवालातून उघड झाली आहे. पाकिस्तानी सैन्याला तोफखान्यातील दारूगोळ्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे फक्त चार दिवस युद्ध लढण्याची त्यांची क्षमता आहे, असे वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
युक्रेन आणि इस्रायलसोबत केलेल्या शस्त्रास्त्र करारांमुळे पाकिस्तानला तोफखान्यातील दारूगोळ्याची कमतरता जाणवत आहे. युक्रेन आणि इस्रयालला शस्त्रसाठ्याचा पुरवठा केल्यामुळे ही टंचाई निर्माण झाली आहे. युद्धाच्या भीतीमुळे पाकिस्तान शस्त्रसाठी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीज (पीओएफ) जागतिक स्तरावर वाढती मागणी आणि जुन्या उत्पादन सुविधांमुळे शस्त्रसाठी उभारणीसाठी झगडत आहे, असे सूत्रांनी सांगितले.
साठ्यात घट झाल्यामुळे, पाकिस्तान युद्धात फक्त 96 तासाच मुकाबला करू शकतो. अशा परिस्थितीमुळे त्यांच्या सैनिकांमध्येही घबराट पसरली आहे. त्याचप्रमाणे हिंदुस्थानी लष्करी कारवाईला रोखण्यासाठी पाकड्यांकडे M109 हॉवित्झरसाठी 155 मिमी शेल किंवा त्याच्या BM-21 प्रणालींसाठी 122 मिमी रॉकेट पुरेसे नाहीत. एप्रिलमध्ये X वरील अनेक पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की 155 मिमी तोफखाना युक्रेनकडे वळवण्यात आला होता. त्यामुळे त्यांचा शस्त्रसाठी कमी झाला आहे.
पाकिस्तानी संरक्षण दलातील अधिकारी दारूगोळ्याच्या कमतरतेमुळे खूप चिंतेत आहेत आणि घाबरले आहेत. 2 मे रोजी झालेल्या विशेष कॉर्प्स कमांडर्स परिषदेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी लष्करासमोरील आव्हाने मान्य केली होती आणि म्हटले होते की, तीव्र संघर्षाच्या काळात हिंदुस्थानशी सामना करण्यासाठी पाकिस्तानकडे दारूगोळा आणि आर्थिक ताकद नाही. अशा परिस्थितीमुळे पाकिस्तान दर्पोक्ती करत असला तरी प्रत्यक्षात ते घाबरले असल्याचे दिसून येत आहे.