खेडची मानसी बोस्टन विद्यापीठात आली दुसरी

खेड तालुक्यातील मोहाने गावचे उद्योजक दिलीप मोरे यांची कन्या मानसी हिने अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातून फार्मास्युटिकल सायन्स या विषयात यशस्वीपणे मास्टर डिग्री पूर्ण केली. या विषयात बोस्टन विद्यापीठात ती दुसरी आली. तिने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.