पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योती मल्होत्राची पाकिस्तान आणि चीनला भेट, उत्पन्नाच्या स्रोतांची होणार चौकशी

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी युट्युबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योती पाकिस्तान आणि चीनला जाऊन आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ट्रॅव्हेल व्लॉग बनवण्यासाठी तिला कुठून पैसे मिळायचे याचीही चौकशी पोलीस करणार आहे.

हिस्सारचे पोलीस अधिकारी शशांक कुमार सावन यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सावन म्हणाले की, हिंदुस्थानात हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तानच्या इंटेलिजन्सनचे ज्योतीला प्रशिक्षण दिले होते. पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योतीने पाकिस्तान आणि चीनलाही भेट दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

ज्योती ही ट्रॅव्हेल व्लॉगर होती. पण परदेशात फिरण्याइतपत तिला इतके पैसे मिळत नव्हते. म्हणून पोलीस तिचे बँकेची खातीही तपासणार आहे, तसेच तिच्या उत्पन्नाचे स्रोत काय आहे याचाही शोध घेणार आहेत. यासाठी तिला इतर ठिकाणाहून पैसे मिळत होते असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.