
राजेंद्र हगवणेला पकडण्यासाठी तीन काय सहा टीम लावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच माझ्या कार्यकर्त्याने गुन्हा केला असेल तर त्यात माझी काय चूक असेही अजित पवार म्हणाले.
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे याची सून वैष्णवी हगवणे हिने सासरच्यांच्या हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. आता या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे हा फरार आहे.
एका कार्यक्रमात अजित पवार म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे वैष्णवी आणि शंशाक हगवणेचा प्रेम विवाह होता. राजेंद्र हगवणे माझा कार्यकर्ता आहे. त्याने मला लग्नाला बोलावलं. लोक प्रेमाने मला लग्नकार्याला बोलावतात आणि मी जातो. जर मी गेलो नाही तर कार्यकर्ते रागावतात. असे असले तरी त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे मी खपवून घेत नाही.
तसेच या प्रकरणी शशांक राजेंद्र हगवणे, लता राजेंद्र हगवणे आणि करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर राजेंद्र तुकाराम बुवा हगवणे आणि सुशील राजेंद्र राघवणे हे दोघे फरार आहेत. त्यांना शोधण्यासाठी तीन टीम मागे लावल्या आहेत. मी म्हणाले तीन काय सहा टीम मागे लावा. आणि पळून गेला असेल तर किती दिवस पळणार? पोलिसांना मी सांगितलं आहे की त्या दोघांच्या मुसक्या आवळून आणा. मृत महिलेचे बाळ हे मुलीचे वडिल आनंदराव कसपटे यांच्या ताब्यात दिले आहे असेही अजित पवार म्हणाले.
मी वृत्तवाहिन्यांवर बातमी बघतोय त्यात अजित पवार अजित पवार म्हणात आहे. सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, माझ्या पक्षाच्या माणसाने काही चूक केली तर त्याच्याशी माझा काय संबंध? मी कुणालाही चूक करायला सांगत नाही. मी आधीही म्हणालो होतो की माझ्या कार्यकर्त्याने असा कुठला गुन्हा केला असेल तर त्याला टायरमध्ये घालून मारा असेही अजित पवार म्हणाले.